शिवोलीत स्वामी सर्मथांची प्रतिष्ठापना
|
शिवोली पुलाजवळील श्री स्वामी
समर्थ मठात स्वामी सर्मथांच्या मूर्ती प्रतिष्ठापनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उद्या, दि. २६ रोजी सकाळी ९.२२ शुभमुहूर्तावर स्थापना होणार आहे.
शिवोलीतील या मंदिराचा इतिहास अवघ्या तीन वर्षांचा आहे. स्वामींचे एक भक्त व देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष नीलेश वेर्णेकर एकदा अक्कलकोट येथे श्रींच्या दर्शनास गेले होते. शिवोली परिसरात स्वामींची मूर्ती असल्यास भाविकांना श्रींचे दर्शन घेणे सुलभ होणार असल्याचा विचार त्यांच्या मनात आल्याने त्यांनी तो आपल्या मित्रांना सांगितला.
त्यांच्या विचारास मित्रांनी सहमती दर्शविली. शिवोली येथे पुलाजवळ असलेल्या खुल्या जागेत दि. ९ नोव्हेंबर २00८ रोजी मूर्ती ठेवण्यात आली. हळूहळू भाविकांचा ओघ वाढू लागला. स्वामी समर्थ भक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे नित्यनियमाने आयोजन करण्यात येऊ लागले. स्वामींची जयंती, पालखी वैगेरेसाठी नामवंत कलाकारांनी कला सादर केली. आशा खाडीलकर, राहुल देशपांडे, देवकी पंडित समवेत गोमंतकीय कलाकारांनी येथे भारतीय संस्कृती जतन केली. भाविक व श्रींच्या आशीर्वादाने अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत देवस्थानने प्रगती साधली. आज इथे देवस्थानचे सुसज्ज मंदिर आकार घेत आहे. गेल्या आठवड्यात येथे पंढरपूरहून स्वामी सर्मथांच्या नूतन मूर्तीचे भव्य मिरवणुकीत स्वागत करण्यात आले. बुधवारी शिखर कलश रोपण झाले. गुरुवारी विविध धार्मिक विधीनंतर रात्री अजित कडकडे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष वेर्णेकर यांनी केले आहे.
शिवोली पुलाजवळील श्री स्वामी सर्मथ मठात स्वामी सर्मथांची मूर्ती प्रतिष्ठापना उत्साहात झाली
प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांनी गायिलेल्या 'गणपतीच्या नावाने वेडा झालो मी', 'जय जय स्वामी सर्मथ' व 'तुम बिन जिया लागे ना', या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. शिवोली येथील श्री स्वामी समर्थ मंदिराची मूर्ती प्रतिष्ठाना झाली. या निमित्त त्यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजिला होता. कडकडे यांचे गायन ऐकण्यासाठी रसिकांनी गर्दी केली. काही जणांनी शिवोली पुलावर बसूनही कार्यक्रमाचा आनंद लुटला. तत्पूर्वी सकाळी मोठय़ा संख्येने उपस्थित भाविकांनी विधिवत श्रींच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल देवस्थानचे अध्यक्ष नीलेश वेर्णेकर यांनी सर्व भाविकांचे आभार मानले. |
Wednesday, 25 January 2012
shree swami samarth murti pratishthapana at siolim शिवोलीत स्वामी सर्मथांची प्रतिष्ठापना
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment